Banglore

केंद्रीय अर्थसंकल्प लोक कल्याणकारी : मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Share

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला केंद्रीय अर्थसंकल्प लोक कल्याणकारी आहे. विकासाचा वेग 6.8% गृहीत धरून मांडलेला हा अर्थसंकल्प विकासाला पूरक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला पूरक असा हा अर्थसंकल्प आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला याचा लाभ मिळेल. विविध क्षेत्रांच्या विकासाला यातून चालना मिळणार आहे. देशाच्या प्रगतीला या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.

रमेश जारकीहोळी काल दिवसभर बोम्मई यांच्यासोबत होते, त्यांनी उघड केलेल्या शिवकुमार यांच्या सीडी क्लीप प्रकरणावर काही चर्चा झाली का या प्रश्नावर बोम्मई म्हणाले, रमेश माझ्यासोबत होते हे खरे आहे. विविध कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झाले. परंतु सीडीबाबत आमच्यात काही चर्चा झाली नाही. कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे काही बोलता आले नाही. त्यामुळे मला त्याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन यावर बोलेन. त्यांनी तक्रार केल्यास कायद्याने कारवाई होईल. कायदा याबाबत आपले काम करेल असे उत्तर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले.

एकंदर रमेश जारकीहोळी यांच्या सीडी बाबत माहिती नसल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

Tags: