महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ मानवतावादी होते. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे गौरवोद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधान सौधाच्या भव्य पायऱ्यांवर विवेक युवा आणि गम्या फौंडेशन, उद्योग आणि वाणिज्य विभाग आणि कर्नाटक गांधी स्मृती निधी यांनी आयोजित केलेल्या “गांधी स्मरण : गांधी नमन” कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महात्मा गांधींचे स्मरण करणे म्हणजेच त्यांना नमन करण्यासारखे आहे. संपूर्ण मानवजातीचे कळल्याने व्हावे असा त्यांना ध्यास होता. लौकिक विचार, जीवनापासून दूर राहून, आपल्या तत्व आणि विचारांवर ठाम राहून लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी जीवन व्यतीत केले. ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ मानवतावादी होते असे बोम्मई म्हणाले.
बोम्मई पुढे म्हणाले की, महात्मा गांधींवर जेवढी टीका, जेवढा अवमान झाला तेवढी टीका, अवमान कोणाचाच झाला नसेल. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या विचारांवर ठाम राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. खऱ्या अर्थाने त्यांनी भारताचे साऱ्या जगापुढे प्रतिनिधित्व केला. आत्मसाक्षी राहून अत्यंत सामान्य माणसासारखे जगून त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी दीप प्रज्वलन करून “गांधी स्मरण – गांधी नमन” कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा राज्य सीमा व नदी संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज व्ही. पाटील, प्रजावणीचे मुख्य कार्यकारी संपादक रवींद्र भट, नाडोजा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. वूडी पी. कृष्णा, विवेक युग फाउंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.


Recent Comments