निप्पाणी तालुक्यातील चांदशिरदवाड गावात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हजरत चांद पीर बाबा उरूस निमित्त अनेक कार्यक्रम होणार असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत यांनी सांगितले.

निप्पाणी तालुक्यातील चांदशिरदवाड गावात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, चांदशिरदवाड गावातील हजरत चांद पीर दर्गा हे हिंदू-मुस्लीम भक्तीचे केंद्र आहे.या उरुसाच्या कार्यक्रमासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक येणार आहेत.ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारी रोजी रोजी घोडा, बैलगाडी शर्यत तसेच ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्षा जयश्री पाटील, शीतल लाडगे, अण्णा पोलीस पाटील, विजय रोहिदास, बाळाबाई पुजारी, दीक्षित कांबळे, यास्मिन चावुस आदी उपस्थित होते.


Recent Comments