Chikkodi

चिक्कोडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Share

चिक्कोडीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वैभव विठ्ठल कुंभार वय २२, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

वैभव हा टॅटू आर्टिस्ट व्यावसायिक असून चिक्कोडीतील प्रभुवाडी येथील रहिवासी आहे. घराशेजारील खोलीत तो टॅटूचा व्यवसाय करतो आणि रोज रात्री 11.30 च्या दरम्यान झोपून सकाळी उशिरा उठतो. त्यामुळे तो आजही झोपला आहे, असे कुटुंबीयांना वाटले.

मात्र संध्याकाळ होऊनही तो न उठल्याने खोलीत बघितले असता, त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. वैभव हा स्वभावाने खूप मनमिळावू होता. त्यांचा मित्रपरिवार मोठे होते. वैभवचे वडील विठ्ठल कुंभार हे माजी सैनिक आहेत. त्याच्या वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. चिक्कोडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: