Belagavi

कर्नाटकात १५० हुन जास्त जागा जिंकू : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी

Share

भाजप तडजोडीचे राजकारण खपवून घेणार नाही असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी म्हणाले .

ते बेळगाव विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कि , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आधुनिक काळातील चाणक्य आहेत .अमित शहा उत्तर प्रदेशचे प्रभारी असताना भाजपकडे खासदारांच्या 10 जागा होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपच्या खासदारांच्या जागा 73 झाल्या. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष होता.
बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे

कोणत्याही क्षेत्रात व्यक्तीशी तडजोड केली जात नाही. आमची लढत 18 मतदारसंघात होणार आहे. तडजोड करून भाजप पक्षाचे कार्यकर्ते व संबंधित संघटनांना विश्वासात घेतले पाहिजे . त्यांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन केले पाहिजे . विरोधकांशी तडजोड पक्ष खपवून घेणार नाही. राज्यात 150 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे
आमच्या योजनांचे 70% लाभार्थी प्रतिक्षेत्रात आहेत. त्यांचे मतदारात रूपांतर झाले पाहिजे

कोणत्याही क्षेत्रात हरण्याचा प्रश्नच येत नाही . जर आम्ही त्यांचे मतदार म्हणून रुपांतर केले तर आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकू . असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

जेडीएसची पंचरत्न यात्रा, त्याचप्रमाणे कुटुंबात तिकीटाची लढाई याबाबत सीटी रवी यांनी देवेगौडा कुटुंबाच्या राजकीय वादावर भाष्य करण्यास नकार दिला

जारकीहोळी आणि सवदी यांच्या गटबाजीच्या राजकारणाच्या मुद्द्याला छेद देत ते म्हणाले कि , कोणत्याही प्रकारच्या दुफळीच्या राजकारणाला पक्षात जागा नाही . आमचा एकच पक्ष आहे , आम्ही एकाच पक्षाचे आहोत , सर्वांनी समान भाजपचे राजकारण करावे . पक्षात भाजपाचे राजकारण जो कोणी करेल त्याला भवितव्य आहे.

भाजपमध्ये तिकीट मागणे गुन्हा नाही. सामान्य कार्यकर्त्यालाही तिकीट मागण्याची मुभा आहे. पक्षाची चौकट असते. पक्षाला वाटेल तर त्या संदर्भात चर्चा होईल तिकिटाचा प्रश्न पक्षाच्या चौकटीत सोडवू. पक्ष दोन निकष ठेवून तिकीट देतो. एक अंतर्गत सर्वेक्षण करतो, दुसरा बाह्य सर्वेक्षण करतो . पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण, बाह्य सर्वेक्षण, पक्षांतर्गत पक्ष संघटनेचे सर्वेक्षण, बाह्य जनमत यावर आधारित तिकीट वाटप केले जाते असे सी टी रवी यांनी सांगितले .

एकंदर कर्नाटकात भाजप 150 हुन अधिक जागा जिंकेल असा विश्वास सी टी रवी यांनी व्यक्त केला आहे . भाजप तडजोडीचे राजकारण खपवून घेणार नाही असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी म्हणाले .

Tags: