बेळगाव जिल्ह्यातील कुडची मतदारसंघातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी विश्वनाथ रामचंद्र गानिगेर प्रबळ इच्छुक असून, त्यांना काँग्रेसने बी फॉर्म द्यावा अशी मागणी कर्नाटक राज्य अनुसूचित जाती-चन्नदासर-होलियादासर-मालदासर जनसेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष बसवराज नारायणर यांनी केली आहे.

या संदर्भात चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बेळगाव जिल्ह्यातील कुडची मतदारसंघातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ रामचंद्र गानिगेर हे आमदारकीसाठी प्रबळ इच्छुक आहेत. ते भटक्या विमुक्त चन्नदासर समाजाचे आहेत. त्यांनी व या समाजाने अनेक वर्षे प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे.
असून कुडची मतदारसंघात काँग्रेसने 17,000 सदस्य नोंदणी करून बाजी मारली आहे. हा कर्नाटकातील विक्रम आहे. तसेच विश्वनाथ गानिगेर यांनी जनतेची भरीव सेवा केल्यानंतर मतदारसंघातील जनतेच्या मनात घर केले आहे. कुडची मतदारसंघात भटक्या चन्नदासर समाजाची लोकसंख्या 18 ते 20 हजारांच्या आसपास आहे, त्याचप्रमाणे अन्य भटक्या समाजाची लोकसंख्या 15 ते 18 हजार असून, सर्व समाज त्यांच्या बाजूने उभा आहे आणि ते भटके असल्याने त्यांना भटक्यांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांना मतदार संघातील सर्व भटक्या विमुक्तांच्या व कुडची मतदार संघातील मतदारांचा त्यांना पाठिंबा आहे.त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी तिकीट देण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी चन्नदासर, होलियादासर, मालदासर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते


Recent Comments