Belagavi

असहाय्य मजुरांना, मुलांना सुरक्षितपणे पाठवले त्यांच्या मध्यप्रदेशातील मूळ गावी

Share

मध्य प्रदेशातून कित्तूर येथे आलेल्या २८ मजूर आणि पाच मुलांना सुरक्षितपणे २८ निजामुद्दीन एक्स्प्रेस ट्रेनने मध्य प्रदेशातील कौडिया आणि कटनी जिल्ह्यांतील त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात आले.

कित्तूर तहसीलदार व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानकावर असहाय उभ्या असलेल्या कामगारांना बसमध्ये बसवून बेळगाव शहरातील एका निराधार केंद्रात आणले व त्यानंतर रेल्वेने या सर्वाना मध्य प्रदेशला पाठवले.

असहाय्य मजूर व बालकांची माहिती घेणाऱ्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल उपविभागीय अधिकारी शशीधर बगली , कित्तूर तहसीलदार अष्टगीमठ, कामगार विभागाचे अधिकारी ज्योति कांते, राजेश अस्नोतेकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags: