EVENT

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा डंका ! तीन दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिकची कमाई

Share

बॉलिवूडचा किंग शाहरुख हा बॉक्स ऑफिसचादेखील बादशाह ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. पठाणने रिलीजच्या दोन दिवसांत छप्पडफाड कमाई केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचेदेखील आकडे समोर आले आहेत. खरं तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात दोन दिवसांच्या तुलनेत कमी कमाई केली, पण वर्ल्डवाइड चित्रपटाची दमदार कमाई झाली आहे.

सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कमाई आकडे सांगितले आहेत. त्यांनी केलेल्या ट्वीटनुसार, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 34 ते 36 कोटींच्या घरात व्यवसाय केला. खरं तर हा सुटीचा दिवस नव्हता. त्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन ठिकठाक म्हणता येईल. पण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत हे आकडे कमी आहेत. सोबतच दंगल, बाहुबली 2 आणि केजीएफ 2च्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये पठाण पिछाडीवर राहिला.

चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सरासरी कमी कमाई केली असली तरी जगभरात चित्रपटाचा जलवा कायम आहे. सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी सांगितल्यानुसार, पठाणने अवघ्या तीन दिवसांत जगभरात बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. आता शनिवारी आणि रविवार वीकेंड आल्याने चित्रपट 500 कोटींच्या आकडा ओलांडणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. अनेक वाद उद्भवल्यानंतरही ‘पठान’ची क्रेझ कमी झाली नाही. ओपनिंग डेवर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जगभरात 106 कोटीची एकूण कमाई केली. ‘पठान’ने पहिल्याच दिवशी इतिहास घडवत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला. कमाईच्या बाबतीत याने ‘केजीएफ 2’ आणि ‘वॉर’साख्या चित्रपटांची विक्रम मोडला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदी भाषेत 55 कोटी तर इतर भाषांमध्ये 2 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटाच्या कमाईचा आकडा अवघ्या दोन दिवसांत भारतात 125 कोटींवर गेला आहे.

जागतिक स्तरावर 8 हजार पडद्यांवर रिलीज केला, नंतर 300 स्क्रीन्स वाढवल्या आहेत. वायआरएफनुसार, ‘पठान’ने जगभरातील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 219.6 कोटींची कमाई केली. ‘केजीएफ 2’ (हिंदी)ने दोन दिवसांत 100.74 कोटी रुपये कमावले तर ‘बाहुबली 2’ ने दोन दिवसांत 81.5 कोटी रुपये कमवले होते. चित्रपट जागतिक स्तरावर 8 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. नंतर 300 पडदे आणखी वाढवले होते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
3 ते 4 दिवसांत जागतिक कमाई 500 कोटी रुपये असू शकते

खरं तर, दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई करणारा ‘पठाण’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. एवढेच नाही तर केरळमधूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिथून चित्रपटाने 1.22 कोटी रुपये कमवले आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका अहवालानुसार, ‘फक्त नॅशनल मल्टीप्लेक्स चेन- पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपॉलिसने दोन दिवसांत 31.60 कोटीचे कमाई केली. चित्रपटाची अशीच कमाई होत राहिली तर 3 ते 4 दिवसांत त्याचे जगभरात 500 कोटींचे कलेक्शन होईल. सर्व नकारात्मकता आणि वाईट समीक्षा असूनही, चित्रपट शनिवारी आणि रविवारी प्रचंड कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

Tags: