Belagavi

18 वर्षांवरील नागरिकांनी मतदार यादीत नोंदवावीत नावे

Share

18 वर्षांवरील नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. असे आवाहन हुक्केरी तहसीलदार दोड्डप्पा हुगार यांनी केले .

राष्ट्रीय मतदार दिनाचा एक भाग म्हणून काढलेल्या जनजागृती पदयात्रेचे नेतृत्व करून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत शहरातील विविध भागात फिरून लोकांमध्ये जनजागृती केली.

माध्यमांशी बोलताना तहसीलदारानी सांगितले , हुक्केरी तालुक्यातील नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी . मतदार यादीत नाव नोंदणीसाठी वेळ देण्यात आला आहे . त्यामुळे मतदार यादी तपासून त्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत असे सांगितले .

तत्पूर्वी, वरिष्ठ न्यायाधीश के.एस.रोटेरा यांनी झेंडा दाखवून मिरवणुकीला सुरुवात केली.

यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ , सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर, वनाधिकारी एम.एम.सज्जन , मुख्याधिकारी मोहन जाधव, अनुसूचित वर्ग अधिकारी जयश्री रोटेरा, ग्रेड 2 तहसीलदार किरण बेळवी , निवडणूक नायब तहसीलदार एम. बालदार , महसूल अधिकारी प्रवीण मालाज आदी उपस्थित होते. .

Tags: