हुक्केरी शहरातील श्री गुरुशांतेश्वर संस्कृत शाळेत बेळगाव विभागातील संस्कृत शाळांच्या शिक्षकांसोबत शैक्षणिक चर्चा कार्यशाळा घेण्यात आली.

हुक्केरी मठाचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे कुलपती प्रा. व्ही. गिरीशचंद्र सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर , नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कुलपती म्हणाले की, संस्कृत ही प्राचीन भाषा आहे, ती राज्याच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः उत्तर कर्नाटक आणि सीमावर्ती भागात लोकप्रिय होण्याची गरज आहे.
म्हैसूर पगडी घालून कुलपती आणि शिक्षकांचा सत्कार करून स्वामीजी म्हणाले कि , संस्कृत भाषा ही आपल्या देशातील समृद्ध भाषा आहे, परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळे ती रूढ झाली नाही . तिचा अधिकाधिक विकास व्हावा.
यावेळी विद्वान सीसी हिरेमठ, संपत शास्त्री, गुंडू शास्त्री, एरण्णा हिरेमठ, पीजी कोन्नूर यांच्यासह बेळगाव, कारवार, विजापूर , हावेरी, धारवाड, बागलकोट जिल्ह्यातील संस्कृत शाळांचे शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments