बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावातील घट्टगी बसवण्णा मंदिराजवळील जंगलात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वीरेश बसलिंगय्या मठपती (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ जवळील जंगमवाडी गावचा आहे.
तो कागल एमआयडीसीमध्ये कामाला होता. दोन दिवसांपूर्वी कामावर गेल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. काल संध्याकाळी त्याने आत्महत्या केली. करोशी गावातील घट्टगी बसवण्णा मंदिराजवळील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या समजू शकलेले नाही. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.


Recent Comments