माजी मंत्री आणि गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात काँग्रेस आणि जेडीएसने दंड थोपटले आहेत. येत्या निवणुकीत त्यांना पराभवाची धूळ चाखायला लावू असा इशारा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बेळगावात संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे गोकाक येथील नेते प्रकाश भागोजी म्हणाले, रमेश जारकीहोळी यांना सत्तेचा गर्व चढला आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणात गुंतवून त्रास द्यायचा, हे त्यांचे तंत्र बनले आहे. सौभाग्यलक्ष्मी साखर कारखाना नफ्यात असूनही डबघाईला आल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांची आणि सरकारची फसवणूक केली आहे. एका महिला लोकप्रतिनिधींविरोधात अवमानकारक वक्तव्य त्यांनी नुकतेच केले आहे. यावरून त्यांची योग्यता दिसून येते. त्यांच्या विरोधात अशोक पुजारी सोडून अन्य कोणी उमेदवार दिल्यास काँग्रेस आणि जेडीएस संयुक्तपणे प्रचार राबवून रमेश जारकीहोळी यांचा प्रभाव करू. मी स्वतः त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे असे भागोजी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जेडीएस नेते ऍड. चंदन गिड्डान्नावर म्हणाले, रमेश जारकीहोळी आणि त्यांचे अन्य बंधू यांचा गोकाकच्या राजकारणावर प्रभाव असला तरी लोकांना आता सगळे काही समजून चुकले आहे. येत्या निवडणुकीत रमेश यांच्या विरोधात काँग्रेस आणि जेडीएस संयुक्तपणे प्रचार करून त्यांचा प्रभाव करू असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments