Chikkodi

वकिलांनी पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत : मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे

Share

वंचिताला न्याय मिळवून देण्याची संधी वकिलांना मिळते. याकडे सकारात्मकतेने पाहून वकिलांनी पीडित आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.

चिक्कोडी येथील न्यायालयाच्या आवारात बेळगाव जिल्हा न्याय खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग चिक्कोडी व वकील संघ चिक्कोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात चिक्कोडी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. बी. आर. आंबेडकर यांनी युक्तिवाद केलेल्या चिक्कोडी न्यायालयासाठी मंजूर केलेली सुसज्ज इमारत एक वर्षाच्या आत बांधण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. परंतु केवळ सुसज्ज इमारतीचे बांधकाम करणे पुरेसे नाही, वकिलांनी क्रियाशील राहून त्यांची सेवा द्यावी असे आवाहन मुख्य न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. वीरप्पा म्हणाले, वकिलांचे लोकांशी चांगले संबंध असले पाहिजेत. पैशाच्या हव्यासापोटी करिअर सुरू न करता सर्वसामान्यांना न्याय देण्याची इच्छा असली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी. आमदार गणेश हुक्केरी. आमदार दुर्योधन ऐहोळे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन मगदुम, के. एस. हेमलेखा. अनिल कट्टी. कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे उपाध्यक्ष विनय मांगलेकर, चिक्कोडीचे सातवे जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश एस. एल. चौहान, चिक्कोडी बार असोसिएशनचे अध्यक्ष नागेश किवड, सचिव एल. व्ही. बोरन्नवर, ऍड. एच. एस. नसलापुरे, बी. आर. यादव, अशोक हरगापुरे, टी. वाय. किवड, बी. ए. आमटे, महादेव बेंदवडे. सरकारी वकील राजू खोत, मुद्दसर जमादार, एम. आर. सगरे, राजशेखर मिर्जी, बी. आर. कमते, व्ही. एन. पाटील, एम. के. पुजेरी, बडे नायकवडी. बी.व्ही. कट्टी. माणिकम्मा कबाडगी, उमा भांडारकर, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

बेळगावचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी स्वागत केले. कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे सदस्य कलमेशा किवड यांनी प्रास्ताविक केले. एम. बी. पाटील आणि सतीश कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. वकील संघाचे अध्यक्ष नागेश किवड यांनी आभार मानले.

Tags: