Kagawad

सिद्धेश्वर जत्रेनिमित्त ऐनापुरात बैलगाडी स्पर्धा उत्साहात

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील सिद्धेश्वर देवाच्या जत्रेनिमित्त आयोजित बैलगाडी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. बैलगाडी स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील सचिन तमदलगे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून एक लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले.

ऐनापूर-मोळे मार्गावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत झाली. या शर्यतीत ऐनापूरच्या दादागौडा पाटील यांच्या बैलगाडीने साठ हजारांचे बक्षीस पटकावत शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

तृतीय क्रमांक किलारी धानोळ्ळी, चतुर्थ क्रमांक विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथील मल्लप्पा तेली यांच्या बैलगाड्यांनी यशस्वीपणे अंतर पूर्ण करून मिळवला.
बैलगाडी शर्यतीचे पहिले एक लाखाचे बक्षीस माजी आमदार राजू कागे यांच्या हस्ते तर दुसरे 60 हजारांचे बक्षीस सदलगाचे माजी आमदार के. पी. मग्गेन्नावर यांच्याहस्ते देण्यात आले.
बक्षीस वितरण केल्यानंतर जत्रा कमिटीचे सदस्य संजय बिरडी यांनी, शासकीय विभागाच्या सर्व अधिकारी, कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली अथणी सीपीआय रवींद्र नायकोडी, कागवाड पीएसआय हनुमंत व आरोग्य विभागाच्या व इतर अधिकाऱ्यांनी जत्रा कमिटीचे आभार मानले.

सकाळी हुगार कन्नड युवक संघाचे अध्यक्ष सिद्धगौडा कागे, कौतुक मग्गेन्नावर यांनी बैलगाडी पूजन करून शर्यतीचे उदघाटन केले. पारितोषिक वितरण समारंभास जत्रा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, निमंत्रक अरुण गाणीगेर, संजय बिरडी, सतीश गाणीगेर, आदिनाथ दानोळी, प्रमोद लिंबिकाई, दऱ्याप्पा केम्पवाडे, अशोक पाटील, सुरेश आदिशेरी व सदस्य उपस्थित होते.
सुकुमार बन्नुरे, आपली मराठी, कागवाड.

Tags: