कार चोरीचा व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्र परिवहनच्या माजी कर्मचाऱ्याला हुक्केरी पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार यांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे.

हुक्केरी तालुक्यातील हंजियनट्टी गावात टोयोटो कार चोरी प्रकरणाचा तपास करणार्या पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहरातील रहिवाशांना अटक करून न्यायालयाच्या ताब्यात दिले.
अटक करण्यात आलेला आरोपी हा गडहिंग्लज परिवहन महामंडळात लिपिक म्हणून काम करत होता, नोकरी गमावल्यानंतर तो जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा आणि भाड्याने गाड्या मिळवणे, त्यांची नंबर प्लेट बदलणे, बनावट नोंदणी तयार करून त्यांची पुनर्विक्री करणे आदी व्यवसाय करत होता आणि त्याच्या साथीदारांमार्फत त्याला अटक केली. गाड्या चोरून त्या विक्री करून पैसे कमवण्यात महारथी होता .
या कुख्यात चोरट्याला पकडण्यासाठी हुक्केरीचे निरीक्षक एम एम तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ए एस सनदी, सी डी पाटील, मंजुनाथ कब्बुरीआणि सहकाऱ्यांनी कारवाईत भाग घेतला .


Recent Comments