शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मारुती गल्ली नरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक भाजी मार्केट अशा ठिकाणी आपल्या जागा असतील तर त्यावर बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर खास करुन महिलांसाठी हायटेक स्वच्छतागृह बांधण्यासाठी तयार आहोत. अशा आशयाचे निवेदन जायंट्स सखीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहेच. तसेच त्यांची ती महत्वाची गरजही आहे.दररोज खरेदीसाठी महिला मोठय़ा संख्येने शहरात येत असतात. पण त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृह नाहीत. आणि जी स्वच्छतागृहे आहेत त्यांची दुरावस्था झाली असुन तेथे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मुळात स्वच्छतागृहांची कमी संख्या व असलेल्या स्वच्छतागृहांची दुरावस्था यामुळे महिलांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन या परिस्थितीकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. बेळगाव जिल्ह्यातील तसेच शेजारील गोवा राज्यातील असंख्य नागरिक खरेदीसाठी किंवा इतर कारणास्तव शहरात येत असतात. यात महिलांची संख्या लक्षणीय असते. हे चित्र पाहता महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह खूपच कमी आहेत. जी आहेत ती अस्वच्छ आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो .बेळगाव शहरातील एक नावाजलेली सामाजिक संघटना म्हणून गेली अनेक वर्षे महिला आणि मुलींसाठी कार्य करणाऱ्या जायंट्स सखीचे सर्व पदाधिकारी सदस्य आपणास विनंती करीत आहोत की शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मारुती गल्ली नरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक भाजी मार्केट अशा ठिकाणी आपल्या जागा असतील तर त्यावर बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर खास करुन महिलांसाठी हायटेक स्वच्छतागृह बांधण्यासाठी तयार आहोत. कृपया या गोष्टीचा विचार व्हावा व महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा यावेळी आयुक्त उपलब्ध नसल्याने डीसी ऍडमीन भाग्यश्री हुग्गी यांना अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते हे निवेदन देण्यात आले.
यावेळी हुग्गी यांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह गरजेचे असून आपण स्वतःहून पुढे आला आहात त्यामुळे तुमचे पहिला अभिनंदन आणि नक्कीच आपण तुमच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करू असे सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, सचिव सुलक्षणा शिनोळकर, सुवर्णा काळे, राजश्री हसबे, वृषाली मोरे आणि अर्चना कंग्राळकर उपस्थित होत्या.


Recent Comments