तालुक्यातील विविध गावांमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असून त्या भागातील संबंधीत प्रशासनाचे अधिकारी तसेच रिंगरोड प्रस्तावाला विरोध अशा निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवण्यात येतील असे माजी आ . मनोहर किणेकर यांनी सांगितले .
रिंगरोडच्या विरोधात सोमवार बेळगुंदी येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले . तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगुंदी गावात मोर्चा काढण्यात आला . यावेळी बोलताना , माजी आ . मनोहर किणेकर म्हणाले कि , तालुक्यातील , ३२ गावातील सुमारे तेराशे एकर भू संपादनाचा घाट प्रशासनाने घातला आहे , या रिंग रोड प्रस्तावाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आम्ही हरकती दाखल केल्या आहेत . तालुक्यातील विविध गावांमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असून त्या भागातील संबंधीत प्रशासनाचे अधिकारी तसेच रिंगरोड प्रस्तावाला विरोध अशा निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवण्यात येतील असे माजी आ . मनोहर किणेकर यांनी सांगितले .

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विकासाच्या नावावर हडप कण्याचा घाट घातला आहे . शेती वाचली तरच शेतकरी जगणार आहे . बेळगावमध्ये झालेल्या अधिवेशनात रिंगरोडच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज होती मात्र त्यांनी तसे केले नाही . त्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समिती याविरोधात आवाज उठवत आहे .आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी एकजुटीने हा लढा देऊ असे माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले .
या जनआक्रोश आंदोलनावेळी , काढण्यात आलेल्या मोर्चात ढोल ताशांचा गजर करण्यात आला . विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावू नका असे फलक घेऊन ,आमची हक्काची सुपीक जमीन देणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या . हा मोर्चा गावभर काढण्यात आला .
ग्रामपंचायतीसमोर तहसीलदार कुलकर्णी याना आपल्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले . यावेळी आर एम चौगुले , आर आय पाटील , ऍड . सुधीर चव्हाण , पुंडलिक पावशे , आदींसह बेळगुंदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Recent Comments