Belagavi

12 विमानसेवा बंद पडूनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : राजकुमार टोपन्नावर यांचा आरोप

Share

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक जोडणी आवश्यक आहे. मात्र बेळगावातून 12 विमानसेवा बंद पडूनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, ही दुर्दैवाची बाब असल्याचा आरोप आम आदमीचे नेते राजकुमार टोपन्नावर यांनी केला आहे.
रेल्वे, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक जोडणी सुसज्ज झाल्यास जिल्ह्यातील शिक्षण, व्यवसाय, उद्योग, पर्यटन, वैद्यकीय आदी सुविधांना अनुकूल होणार आहे. परंतु सुमारे 12 विमानसेवा बेळगावहून बंद झाली असली तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यात बसेस कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांकडून बेळगावात येणार्या परिवहन कंपनीसह अनेक योजना पळवत आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून निवडणुकीच्या तयारीत गुंतल्याचे वास्तव विकासाकडे दुर्लक्ष होण्याचे कारण आहे.
बेळगाव विमानतळावर यापूर्वी दोन-तीन वेळा आंतरराष्ट्रीय विमाने दाखल झाली आहेत. दक्षिण आणि उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी विमाने होती. बेळगाव ते दिल्ली दैनंदिन विमानसेवाही सुरू झाली. बेळगावहून दररोज शेकडो प्रवासी ये-जा करत असत. दरम्यानच्या काळात विमानसेवा आली असतानाही याकडे शासन किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे टोपण्णावर यांनी म्हटले आहे.

Tags: