रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील चापोली गावात घडली आहे.

गंगाराम धुलू शेळके, वय 70 असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. काल ते गवळीवाडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात जात होते. त्यांनी भात, मिरची यांसारखी उन्हाळी पिके घेतली आहेत. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असताना रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हातात काठी घेऊन गंगारामने सर्व शक्तीनिशी त्याचा प्रतिकार केला. त्यामुळे डुक्कर जंगलात पळून गेले. या हल्ल्यात गंगाराम यांच्या पायाला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


Recent Comments