Hukkeri

अभियांत्रिकी शिक्षण आता कन्नडमध्ये उपलब्ध : कुलगुरू डॉ. विद्या शंकर

Share

अभियांत्रिकी शिक्षण कन्नड भाषेतही उपलब्ध होणार असल्याची माहिती बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विद्याशंकर यांनी दिली.

संकेश्वर येथील श्री दुरुदुंडेश्वर विद्यावर्धक संघाच्या सीबीएससी शाळेच्या “उडान-3” कार्यक्रमाचे आज उदघाटन करून ते बोलत होते. डॉ. विद्याशंकर पुढे म्हणाले की, कन्नड विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभियांत्रिकीच्या पाठ्यपुस्तकांचे कन्नड भाषेत भाषांतर करणे हा उद्देश आहे. त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कन्नडमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानं आरक्षण देण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी संकेश्वर सीमाभागात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शाळा सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नोकऱ्या मिळण्याची सोय केली आहे हे प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

एसडीव्हीएस संचालक मंडळाचे सदस्य डी. एस. केस्ती, के. सी. शिरकोळी, आर. बी. पाटील, विजय रवदी, प्रशासक डॉ. बी. ए. पुजारी, सचिव जी. एस. कोटगी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि यश मिळविणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

त्यानंतर बोलताना संघाचे अध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात उत्कृष्ट शिक्षण देण्यात एसडीव्हीएस संघ यशस्वी झाला आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी प्राचार्य एम. एस. कामत, विविध विभागाचे प्रमुख कस्तीज जगजंपी, अदिती चलके, पल्लवी मेक्के, बसवराज निपाणी, हर्षल हंजी, तसेच सीबीएससी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Tags: