स्वधर्माचा अभिमान म्हणजे परधर्माचा द्वेष नाही आणि त्याच पद्धतीने स्वभाषेचा अभिमान म्हणजे परिभाषेचा द्वेष कशाला असला पाहिजे ? दोन राज्य ही राष्ट्राचा भाग असतात . राष्ट्र टिकले तर राज्ये टिकतील , आणि राज्य टिकले तर राज्याची अस्मिता टिकते . त्यामुळे राज्य टिकणे जास्त महत्वाचे आहे असे सुप्रसिद्ध अभिनेते तसेच महाराष्ट्राचे खा . अमोल कोल्हे म्हणाले .
यमकनमर्डी विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजाच्या वतीने कडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना वर्धापन दिन, राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वराज्य संकल्प महामेळाव्यात ते बोलत होते . नव्या पिढीला महापुरुषांचे जीवन, आदर्श, विचार यांची माहिती मिळावी, त्यापासून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा स्वराज्य संकल्प महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून बोलताना डॉ . अमोल कोल्हे म्हणाले कि , तुम्हाला माय आणि मावशी या दोघीचे प्रेम लाभतेय , तुम्ही भाग्यवान आहात . मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेत तुम्हाला प्रतिसाद देता येतो . त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा यावर सगळे ठरवायचे असते . शिवकालीन परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप फरक आहे . आजकालच्या काळातले देशातले एकूण वातारण बघितले तर , या वातावरणात धर्माची सांगड घातल्याचे दिसून येते . मी जन्माने हिंदू आहे आणि मला हिंदुत्वाचा अभिमान असणे यात गैर काहीच नाही . जात आणि धर्म हे दगडासारखे असतात . स्वधर्माचा अभिमान म्हणजे परधर्माचा द्वेष नाही आणि त्याच पद्धतीने स्वभाषेचा अभिमान म्हणजे परभाषेचा द्वेष कशाला असला पाहिजे ? दोन राज्य ही राष्ट्राचा भाग असतात . राष्ट्र टिकले तर राज्ये टिकतील , आणि राज्य टिकले तर राज्याची अस्मिता टिकते . त्यामुळे राज्य टिकणे जास्त महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

तर कसबा नुल येथील रामनाथन् समाधीमठाचे राष्ट्रीय धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराज यांनी सांगितले कि , ते शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने त्यांच्या मठात संस्कृत पाठशाळा चालवतात . या पाठशाळेत फक्त हिंदू नाही तर मुस्लिम मुले देखील संस्कृत शिकतात . आणि या संस्कृत पाठशाळेत १२ बलुतेदार आहेत . सर्व जातीधर्माचे मुले इथे वेद शिकायला येतात . आणि शिवाजी विद्यापीठ त्यांचे वेदाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्रमाणपत्र देते असे सांगितले .

कडोली येथील श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या स्वराज्य संकल्प महामेळाव्याला यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी , कडोली दुरदुन्डेश्वर मठाचे गुरुबसवलिंग स्वामीजी तसेच अन्य मान्यवर तसेच यमकनमर्डी मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते .


Recent Comments