Chikkodi

चिकोडीच्या के एल इ इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

Share

चिकोडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सीएसई विभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संशोधन – इंटिग्रा स्कॉलर्स प्रोग्राम 2023 प्रकल्पाची नॅशनल फाऊंडेशन फॉर अॅडव्हान्समेंटसाठी निवड झाली आहे, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. असे चिक्कोडीच्या के एल इ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद रामपुरे यांनी सांगितले .

संगणकशास्त्र विभागातील प्रा. शिल्पा होसगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलक्ष्मी गिड्डा, उम्मेहानी कानवडे, सिंधू मठपती , रश्मी खोत या विद्यार्थिनींनी “अ वर्च्युअल मशीन एक्सट्रोस्पेक्शन – अ रिव्हर्स रिट्रीव्हल इन क्लाउड” या विषयावर प्रकल्प सादर केला. ते म्हणाले की, संगणक विज्ञान विभागाने कर्नाटकातून राज्यस्तरावर निवडलेल्या 37 प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आमच्या महाविद्यालयाचा आहे.

Tags: