सौंदत्ती यल्लमा डोंगराकडे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मार्गस्थ झालेले कंग्राळी बुद्रुक येथील सर्व भाविक आज आपल्या गावी परतले आहेत. गावी परतल्यानंतर त्यांनी पडल्या भरल्या आणि सर्वजण आपल्या पडल्या घेऊन तसेच देवीचा जग घेऊन आपल्या घरी मार्गस्थ झाले.
बी के कंग्राळी गावातील सर्व रेणुका भक्त आपल्या पडल्या आणि जग घेऊन यल्लमा डोंगराकडे गेल्या आठवड्यात रवाना झाले होते. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी आठ दिवस मुक्काम केल्यानंतर तसेच सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर आज गावाकडे माघारी आले आहेत.

सर्व भाविक गावी आल्यानंतर या ठिकाणी पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. दर तीन वर्षांनी अशाच प्रकारे गावामध्ये देवीचा जल्लोष करण्यात येतो.
देवस्की पंच आणि ग्रामपंचायतीच्या आवाहनाला अनुसरून गावातील सगळ्या रेणुका भक्तांनी एकत्रितपणे पडल्या भरण्याचा कार्यक्रम केला . यामुळे गावातील सर्वांची एकी दिसून आली .यापुढेही अशाच एकीने कार्यक्रम करूयात असे आवाहन देवस्की पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले .
आज भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचे स्वागत केल्यानंतर सर्व भाविक या ठिकाणी आपल्या हातून कोणती चूक झाली असल्यास क्षमा कर आणि आमच्या हातून तुझी कायम सेवा करून घे अशी प्रार्थना केली. आणि सर्वजण पडल्या घेऊन तसेच देवीचा जग घेऊन आपल्या घरी मार्गस्थ झाले.


Recent Comments