रेणुका-यल्लम्मा देवीच्या मारग मळणी या मळ्यातील यात्रेच्या जागेत येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रेणुका-यल्लम्मा देवीची सौंदत्ती येथील यात्रा संपवून येळ्ळूरचे भाविक गावाच्या बाहेर मारग मळणी ही मळ्यातील यात्रा हणमंत गौड नगर येथे साजरी केली जाते. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रेच्या ठिकाणी वास्तव्य केलेल्या प्रत्येक कुटुंबाला मंगळवारी कचरा जमा करण्यासाठी कचरा पिशव्यांची व्यवस्था करून त्या कचरा पिशवीत जमा करावा असे आवाहन भाविकांना केले होते. भाविकांनीही ग्राम पंचायतीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला व ग्राम पंचायतचे कौतुक केले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवून तो परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, अजय पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments