वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याच्या बांधकामाला विरोध करणारे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या कृतीचा चिक्कोडी जनता तीव्र निषेध करत असल्याचे विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.

प्रकाश हुक्केरी यांनी दोन दिवसांत जिल्हाधिकार्यांसमोर दिलेले निवेदन मागे घ्यावे अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात येईल, असा इशारा चिक्कोडी शहरातील केशव कला भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
याआधी चिक्कोडी येथे 1990 च्या दशकात , डॉ.बी.आर.आंबेडकर पुतळा त्यानंतर बसवेश्वर पुतळा , छत्रपती शिवाजी पुतळा , कनकदास पुतळा उभारण्यात आला . यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे पुतळे उभारण्यात आले होते . फक्त या पुतळ्यांविषयी पालिकेत ठराव करण्यात आला होता . या राणी चन्न्नम्मा पुतळ्यासंबंधी जिल्हाधिकारी व संबंधित मंत्र्यांशी यापूर्वीच चर्चा झाली असून आश्चर्य वाटू नये, असे ते म्हणाले.
शहराचा हा मुख्य रस्ता कित्तूर चन्नम्मा रोड म्हणून ओळखला जात असल्याने या रस्त्यावर चिक्कोडी महानगरपालिका, व्यापारी संघटना आणि एम.के. कवटगीमठ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन यांनी संयुक्तपणे चन्नम्मा पुतळा उभारण्याची मागणी लोकांच्या मागणीवरून केली आहे.
या संदर्भात पालिकेत ठराव मांडून , व्यापारी संघटना व पुतळा अनावरण समितीने 16 जानेवारी रोजी राणी चन्नमा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते समाजात फूट पाडणारे वातावरण निर्माण करत आहेत. त्यांनी ते थांबवून स्वत:ची चूक सुधारावी अन्यथा आगामी काळात जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असे ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ , हेस्कॉमचे संचालक महेश भाटे, संजय पाटील, संजू बडिगेर, शांबवी अश्वथपुरे, काशिनाथ कुरणे आदी उपस्थित होते.


Recent Comments