संगोळी रायण्णा हे सर्वांसाठी आदर्श असल्याचे उद्योजक पृथ्वी कत्ती यांनी सांगितले.

क्रान्तीवीर संगोळी रायण्णा यांच्या ज्योतीचे आज हुक्केरी शहरात स्वागत करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड व संस्कृती विभागाकडून , 12 व 13 जानेवारी रोजी रायण्णा उत्सवात सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आलेल्या ज्योती रथावर तहसीलदार डॉ.दोड्डाप्पा यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
तहसीलदार रायण्णा यांनी हा उत्सव हा केवळ शासकीय उत्सव न राहता लोकांचा उत्सव असायला हवा. असे सांगितले .

आज हुक्केरी शहरात ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले व शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून लोकांना प्रबोधन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील, बीईओ मोहन दंडिन चन्नाप्पा गजबर, महसूल अधिकारी प्रवीण मालाज , बसवराज नादुरकर, ग्रामसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments