बेळगाव महानगर पालिकेतर्फे शहरातील रस्त्यांवर बसून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी , विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . खेळ , मनोरंजन यासहित सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सोमवारी , राष्ट्रीय उपजीविका अभियान , कौशल्य विकास उद्यमशीलता , तसेच उपजीविका विभागाच्या संयुक्त विद्यमाने , “आजादी का अमृतमहोत्सव ” अंतर्गत , रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सकाळपासूनच , शहरातील लेले मैदान , पोलीस ग्राउंड येथे खेळांचे आयोजन करण्यात आले होते .
त्यानंतर कुमार गंधर्व हॉलमध्ये मनोरंजन तसेच सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . खा . मंगला अंगडी यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले . यावेळी त्या म्हणाल्या कि , देशात प्रथमच रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ही योजना अंमलात आणणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत . राज्य आणि केंद्र सरकारकडून तुमच्यासाठी लागू केलेल्या योजनांचा तुम्ही लाभ घ्यावा तसेच , आपली मुलांचे भविष्य उज्ज्वल घडवावे .
आ . अनिल बेनके म्हणाले कि , रस्त्यावर बसून व्यापार करणारे विक्रेते आठ ते दहा तास मेहनतीने व्यवसाय करतात . त्यांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत . शिस्तीने आणि सचोटीने व्यापार करा . अडचण निर्माण करू नका . तुम्ही मुलांसाठी मेहनत करून जे काही करता , त्याच साठी सरकारकडून देखील योजना अमलात आणल्या गेल्या आहेत . त्याचा लाभ घेऊन आपल्या मुलांना योग्य शिक्षण द्या . तुमच्या पाठीशी सरकार आहे असे ते म्हणाले .
या कार्यक्रमात रस्त्यावरील व्यापारी तसेच त्यांच्या मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .
या कार्यक्रमात महानगर पालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी , उपायुक्त भाग्यश्री हुग्गी , कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री , शहर व्यापारी समितीचे सदस्य प्रसाद कवळेकर , इमाम हुसेन नदाफ , संगीता खोत, विजय चव्हाण आदी उपस्थित होते .
Recent Comments