पोलीस खाते लोकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. सीमेवरील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासह कोविड आणि पुराच्या वेळी लोकांचे रक्षण करण्याचे तसेच शांतता राखण्याचे पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी काढले.

चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 20 वर्षांपूर्वी गावातील तंटे गावपातळीवर सोडविण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य एकत्र येत होते. आता ते थांबले आहे. ते पुन्हा सुरू झाल्यास पोलिस खात्यावरील ताण कमी होऊ शकतो, असे म्हणाले.

रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले, पाऊस असो वा ऊन, पोलिसांनी जनतेची सेवा करणे हे कौतुकास्पद आहे. जनतेने या पोलीस ठाण्याच्या सेवेचा लाभ घ्यावा. रायबाग पोलीस ठाण्यात चिंचाळी शहराचा समावेश करावा. रायबाग तालुका अथणीचा समावेश डीवायएसपीच्या श्रेणीत करण्यात आला असून त्याचा समावेश चिक्कोडीत करण्यात यावा, असे ते म्हणाले.
माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, लोकांच्या रक्षणासाठी पोलीस रात्रंदिवस काम करतात. एका घरामागे चार ते पाच वाहने असल्याने वाहतूक कोंडी होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस ठाणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
यावेळी आमदार गणेश हुक्केरी यांनी अध्यक्षीय भाषणे झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी प्रास्ताविक केले. 2015 मध्ये चिक्कोडी येथे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. ही इमारत 1.52 कोटी खर्चून बांधली आहे. जिल्ह्यात १३ पोलीस ठाणी बांधण्यात आली आहेत. यमकनमर्डी, कुलगोड, खानापूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दोन बेडरूमचे घर बांधण्याची कार्यवाही केली आहे. ते म्हणाले की, 9 पोलिस ठाण्यांमध्ये 108 पोलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
व्यासपीठावर चिक्कोडी प्रांताधिकारी माधव गीते, डीवायएसपी बसवराज यलिगार, मनोजकुमार नाईक, विरेश दोडमणी, महावीर मोहिते, श्याम रेवडे, रामा माने, अनिल पाटील, साबीर जमादार, रवी हंपन्नावर, मुद्दसर जमादार, सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय यमनाप्पा मांग आदी उपस्थित होते. निप्पाणीच्या पीएसआय कृष्णवेणी यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले.


Recent Comments