बेळगाव तालुक्यातील कडोली येथे ३८ वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले . श्री दूरदुन्डेश्वर मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत आज साहित्याचा जागर झाला .
कडोली येथे रविवारी , ३८ वे साहित्य संमेलन पार पडले . सकाळी साडेनऊ वाजता पालखी पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली . ह. भ . प. प्रवीण गणपती मायाण्णा यानी पालखीचे पूजन केले . अनेक वारकरी मंडळे , भजनी मंडळे, शाळेचे विद्यार्थी , तसेच विविध महापुरुषांचा पेहराव केलेली मुले, या ग्रंथदिंडीत सहभागी झाली होती .

यानंतर झालेल्या पहिल्या सत्रात , संमेलनाध्यक्ष नितीन सावंत , यांनी संमेलनाचे उदघाटन केले . यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कडोली गावातील साहित्य संमेलनाच्या परंपरेचे कौतुक केले . यावेळी त्यांनी संतांची शिकवण , संतांचे साहित्यातील योगदान , संत चळवळ आणि साहित्य याबद्दल आपले विचार मंडळे .
तर दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले . यामध्ये सांगलीचे प्रा . दीपक स्वामी , महेश कराडकर , त्याचप्रमाणे , नाना हलवाई या कवींनी आपल्या कविता सादर केल्या . स्नेहभोजनानंतर , तिसऱ्या सत्रात डॉ . संजय कळमकर यांचे ” माझा मराठाची बोलू कवतुकें ” या विषयावर व्याख्यान पार पडले . त्यानंतर चौथ्या सत्रात शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर आणि सहकाऱ्यांचा ” सह्याद्रीचा सिंह गर्जतो ” हा पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला .
प्रारंभी यल्लोजीराव तानाजीराव पाटील याची संमेलनाचे उदघाटन केले . स्वामी विवेकानंद नगरीचे उदघाटन कुशल कुट्रे यांनी तर सांगाती व्यासपीठाचे उदघाटन प्रा . एच के गावडे यांनी केले तर ग्रंथ दालनाचे उदघाटन मोहन पाटील यांनी केले .

एकंदर आज कडोली गावात साहित्य संमेलनानिमित्त अनेक कवी आणि लेखकांच्या सहभागाने , साहित्य प्रेमींना मेजवानी मिळाली


Recent Comments