संगोळ्ळी येथे होणा-या संगोळ्ळी रायण्णा उत्सवानिमित्त आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी खानापुर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या वीर मशालीला अभिवादन केले व त्यानंतर मशाल प्रज्वलित करून उत्सवाची सुरुवात केली.


यावेळी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी पोलीस ठाण्यासमोर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व श्री क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा की जय, कित्तूर चन्नम्माजी की जय अशा घोषणा देत संगोळ्ळी रायण्णा येथील भाविकांना प्रेरणा दिली.
यावेळी प्रभारी तहसीलदार के.वाय.बिदरी व इतर तालुकास्तरीय अधिकारी, तसेच ग्रामीण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments