बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील उचगाव गाव ते श्री मळेकरणी मंदिर या रस्त्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत . आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत काँक्रीट रस्ता व गटार बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले.

मळेकरणी देवी हे या भागातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीनुसार इथला रस्ता विकसित करण्यात येत आहे. हेब्बाळकरम्हणाल्या कि , दर्जेदार रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक युवराज कदम, बाळकृष्ण तिरसे, सुनिल देसाई, संतोष पाटील, अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, मंदिराचे विश्वस्त समिती उपस्थित होते.


Recent Comments