मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देणार की नाही हे 24 तासांत स्पष्टपणे सांगावे, असे आव्हान विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिले.
बेळगावातील गांधी भवन येथे गुरुवारी पंचमसाली लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. पंचमसाली समाजाला व डी आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आम्ही सरकारला कोणतीही धमकी दिली नाही. सुवर्णसौधला घेराव घातला असता तर तो धमकी ठरली असती असे ते म्हणाले. बेळगाव अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यापासून आमची दिशाभूल करत आहेत. ते कधी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवतात. त्या आयोगाचे अध्यक्ष कधी पाऊस आणि कधी कोरोना अशा खोट्या सबबी सांगतात. बोम्मई यांनी आईच्या नावाने शपथ घेतली आणि अशी फसवणूक केली. पंचमसालींनी समाजाला त्यांनी खुळ्यात काढले असा टोलाही त्यांनी लगावला.
आता आरक्षणाच्या दिवशी फोन करून भेटू असे बोम्मई यांनी सांगितले होते. काही यूट्यूब चॅनेलवर यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा होती. हे सत्यापासून दूर आहे असे ते म्हणाले. 22 डिसेंबर रोजी सुवर्णसौधला घेराव घालणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण बोम्मई यांचे आईवर खूप प्रेम आहे. अशा आईची शपथ त्यांनी घेतल्याने आम्ही आमचा निर्णय मागे घेतला. यावेळचे आंदोलन तितके सोपे नाही. 24 तासात पंचमसाली समाजाला आरक्षण देणार का, घरी जाणार? असा सवाल त्यांनी केला.
बसवराज बोम्मई यांना बहुधा भाजपचे शेवटचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. पंचमसाली समाजाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी आमच्या समाजाची फसवणूक केल्याची भावना संपूर्ण पंचमसाली समाजात निर्माण झाल्याचे ते म्हणाले.


Recent Comments