Khanapur

खानापूर सीडीपीओंच्या बदलीमुळे आ. निंबाळकर उपसंचालकांवर गरम

Share

खानापूर तालुक्याचे सीडीपीओ राममूर्ती यांची बदली झाली असून, ते दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत. त्यांचा पदभार सहाय्यक सीडीपीओकडे देण्यात आला आहे. याची माहिती मिळताच आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या उपसंचालकांना फोन करून फैलावर घेतले.

महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक बसवराज ए. एम. यांच्यावर आ. अंजी निंबाळकर चांगल्याच गरम झाल्या. त्यांनी बसवराज याना फोन करून सीडीपीओची बदली कोणी केली, अशी विचारणा केली, निवडणूक फक्त तीन ते चार महिन्यांवर आहे, त्यांची बदली करण्याची काय गरज आहे, तुम्ही कनिष्ठांना पदभार का दिला, यात काही कमी-अधिक झाल्यास त्याला कोण जबाबदार आहे, अंगणवाडी मुले, गरोदर महिलांना पोषण आहार देण्याची जबाबदारी सीडीपीओंवर असते. त्यांच्या बदलीमुळे त्यांना तो आहार मिळत नाही. याबाबत मी गेल्या अधिवेशनात बोलले होते, सीडीपीओची पदोन्नती दोन-तीन महिन्यांत होती, त्यामुळे ते गेले असतील तर हरकत नाही. पण दुसरा सीडीपीओ नेमणे गरजेचे होते. त्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चार्ज का दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती आमदारांनी केली.

खानापूरसारख्या सीमावर्ती, जंगल भाग अधिक असलेल्या तालुक्यात गरोदर महिलांना सकस, पोषक आहार मिळणे गरजेचे आहे. त्यात काही त्रुटी राहिल्यास गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. उपसंचालक बसवराज यांनी प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करू असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर तुम्हाला काय करायचे ते करा, पण तालुक्याला जबाबदार सीडीपीओ नेमा असे सांगत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अचानक कॉल कट केला. फ्लो

Tags:

khanapur-anjali-nimbalkar-outrage-on-deputy-director-basavaraj/