Chikkodi

मोदींच्या मातोश्रींच्या निधनावर श्रीशैल जगद्गुरूंकडून शोक व्यक्त

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाने मोदींच्या कुटुंबीयांना शोक सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो अशा शब्दांत श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी शोक व्यक्त केला.

आंध्रप्रदेशातील श्रीशैल येथे व्हिडिओ निवेदन जारी करून बोलताना श्रीशैल जगद्गुरूंनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे आज दुःखद निधन झाले आहे. स्वर्गीय हीराबेन मोदी यांनी देशाला एक महान, उच्च आणि नीतिमान पुत्र दिला आहे. याचे श्रेय हीराबेन यांचे आहे. या देशाला पंतप्रधान मोदींसारखा सुपुत्र दिला आहे जो या देशाला घडवत आहे आणि भारताला जागतिक गुरु भारत बनवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ईश्वर हिराबेन मोदी यांच्या आत्म्याला शांती देवो, आणि मोदी  यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा शब्दांत श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडितराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी शोक व्यक्त केला.

Tags:

shrishail-jagadguru-condolence-to-pm-modi-mother/