Belagavi

सायंकाळच्या बैठकीकडे आमचे लक्ष : बसव जयमृत्युंजय स्वामीजी

Share

पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याबाबत आज सायंकाळी पाच वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी आज गुरुवारी शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पंचमसाली समाजाच्या 2-ए आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष बेळगावात थांबला आहे. आपल्या समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ व मंत्री सी. सी. पाटील यांच्यासह आमच्या शिष्टमंडळाला कोणत्याही कारणास्तव घेराव घालू नये, असे आवाहन करून 29 डिसेंबरला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

पण काही अफवा पसरत असून समाजाला आरक्षण देण्यासाठी पंचमसालींनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे प्रकरण आम्ही अभ्यासले आहे. त्याचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: