उसाला प्रतिटन 5,500 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आज सोमवारी सुवर्णसौधला घेराव घालणार होते . त्यापार्श्वभूमीवर , पोलिसांनी रात्रीच शेतकरी नेत्यांना अटक केली .
उसाला प्रतिटन 5,500 रुपये भाव देण्यासहित ,विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी आज शेतकरी संघटनांकडून ,सुवर्णसौधला घेराव घालण्यात येणार होता . परंतु पोलिसांनी रविवारी रात्रीच , घरात झोपलेल्या शेतकरी नेत्यांना पकडून न पोलीस ठाण्यात नेले.
त्यामुळे पोलिस आणि सरकारविरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे . बेळगावातील मार्केट पोलिस ठाण्यासमोर पोलिसांची शेतकऱ्यांशी झटापट झाली. अटक केलेल्या शेतकरी नेत्यांच्या सुटकेसाठी चुनाप्पा पुजारी यांनीही आंदोलन पुकारले . पोलिस ठाण्यासमोर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अटक करण्यात आली.पोलिसांनी आठहून अधिक शेतकऱ्यांना मार्केट पोलिस ठाण्यातून अन्य ठिकाणी हलवले आहे.
यावेळी , कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि संस्थापक इ एन कृष्णेगौडा तसेच
शिवानंद मुगलीहाळ यांनी सरकार आणि पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला . सरकारने आमच्या मागण्यांविषयी चर्चा न करताच आम्हाला आंदोलनकरण्याआधीच अटक केली आहे .
पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेत.


Recent Comments