काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत आ. सी. टी. रवी यांनी त्यांच्यावर पलटवार केला.

सुवर्णसौधमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी म्हणाले, दरवर्षी मी माझी मालमत्ता जाहीर करत असतो. मी एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी राजकारणात येण्यापूर्वीच माझ्या मालमत्तेचे तपशील सादर केले आहेत, शंका असलेल्यांनी हवे तर लोकायुक्तांकडे जावे. माझी संपत्ती 800 पट वाढलेली नाही. ते एका बाजूने बटाटे लावतात आणि दुसऱ्या बाजूने सोने घेतात. माझी कोणतीही बेकायदेशीर मालमत्ता नाही याची खातरजमा करू द्या. मी कोतवाल रामचंद्रांचा शिष्य नाही, मी कोणाच्या टोळीत सामील झालो नाही, त्यांना माझा ट्रॅक रेकॉर्ड घेऊन तपासू द्या, त्यांनी माझ्याबद्दल मी नशेत असल्यासारखा बोलतो म्हटले, माझ्या रक्तात गांजा, दारू असे काही सापडले असेल तर त्यांना बोलू द्या.
माझ्यासोबत कोणीही स्पर्धा करू देत, इथून बेळगावपर्यंत धावून दाखवतो. नशेत कोणाला धावता येत नाही हे सर्वांना माहीत आहे, असा पलटवार रवी यांनी बी. के. हरिप्रसाद यांच्यावर केला.


Recent Comments