सुळगा ब्रह्मलिंगेश्वर हायस्कूल कंपाऊंड कामाला आ. हेब्बाळकरांकडून चालना
विद्यार्थ्यांचे शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. याबाबत शालेय परिसराच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा (हिंडलगा) गावातील श्री ब्रह्मलिंगेश्वर हायस्कूलच्या नवीन कंपाऊंड भिंत बांधकामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून केला.

आ. हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, ज्या शाळांमध्ये मुलांना शिक्षण दिले जाते, त्या शाळांची स्थिती आणि पावित्र्य राखणे हा तितकाच महत्त्वाचे असून कंपाऊंड बांधण्याची मागणी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ बाबू गडकरी, काँग्रेसचे युवानेते मृणाल हेब्बाळकर, भागण्णा नरोटी, डी. डी. पाटील, संजय पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, निर्मला कलखांबकर, यल्लाप्पा कलखांबकर आदी उपस्थित होते.


Recent Comments