बेळगावात भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल ,अरण्य निगम कर्नाटक राज्य समन्वयक सुरेश देसाई यांनी बेळगावच्या केएसआरटीसी डीसी यांची भेट घेऊन तालुक्यातील बस समस्येवर चर्चा केली आणि खानापूर बेळगावची बस वाहतूक सुधारण्याची मागणी केली.

खानापूरहून बेळगावला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, खानापूरहून सकाळी बेळगावला जाणाऱ्या बसची संख्या कमी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजांमध्ये जाण्यास उशीर होत आहे, बसेस अनियमितपणे येत आहेत. बस वाहतूक नियमित करावी . खानापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या बसेस इंदलहोंड क्रॉस येथे न थांबता थेट महामार्गावरील पुलावर जात आहेत.महामार्गावरील पूल ओलांडण्याऐवजी सर्व्हिस रोडवर उतरून बसेस थांबवाव्यात.
या मागण्या गांभीर्याने घेत बेळगावात सुरू असलेले अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या समस्या तात्काळ सोडवून बस वाहतूक सुरळीत करू आणि जादा बसेस उपलब्ध करून बस वाहतुकीची संख्या वाढवू.असे बेळगावच्या केएसआरटीसी डीसीनी सांगितले .


Recent Comments