Athani

महिषवाडगी ग्रामस्थांकडून खराब रस्त्यांचा रस्त्यावरच चहा पाजून निषेध

Share

गावाला आवश्यक असलेला रस्ता गेल्या 20 वर्षांपासून विकसित झालेला नाही, आमदारांनी रस्ता कामासाठी दोनदा भूमिपूजन करूनही तो बांधला नाही, निषेधार्थ अथणी तालुक्यातील महिषवाडगी येथील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले, त्यांनी रस्त्यावर चहा बनवून लोकांना पाजून राग व्यक्त केला.

अथणी तालुक्यातील महिषवाडगी गावात झिरो पॉईंटपासून आणि महिषवाडगी ते सवदी गाव या पाच किमी रस्त्याच्या मागणीसाठी महिषवाडगी ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यावरच चहा तयार करून त्याचे वाटप केले.  ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना काँग्रेसचे नेते गजानन मंगसुळी म्हणाले की, या गावात 20 वर्षांपासून रस्ता झाला नाही, आमदार काय करत आहेत? ही त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही का, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कुमठळ्ळी या गावात एकदाच आले हे दुर्दैवी आहे. आमदारांनी रस्त्यासाठी एवढे कोटी तेवढे कोटी अनुदान आणले हे सांगण्याऐवजी रस्ता बांधावा अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर गावकरी अशोक मुगन्नवर यांनी सांगितले की, पूर आल्यावर गावाबाहेर जाण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला रस्ता तयार केला जात नसल्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत असा संताप व्यक्त केला. काँग्रेस नेते सत्यप्पा बाग्यन्नवर, श्रीकांत पुजारी शिवू गुडापूर, सुनिल संक, रेखा पाटील, महादेवी होलीकट्टी, अनिल नंदगाव, सागर मुगन्नवर, सुरेंद्र सिद्धवगोळ, नेमिनाथ नंदगाव, तिप्पाण्णा नंदगाव, महावीर अजप्पगोळ, विजय तेरदाळ आदी उपस्थित होते.
राकेश मैगुर, आपली मराठी, अथणी.

Tags: