Athani

अथणीमध्ये संगोळी रायण्णा पुतळयाचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी केले लोकार्पण

Share

अथणीचे ज्येष्ठ नेते एस.के. बुटाली यांच्या देणगीतून निर्माण करण्यात आलेल्या क्रांतिकारी संगोळी रायण्णा यांच्या पुतळयाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .

शहरातील विजापूर रोडला उभारण्यात आलेल्या संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आपल्या तरुणांनी रायण्णाची देशभक्ती आणि राजनिष्ठा आत्मसात केली पाहिजे. महाजन यांच्या अहवालानुसार बेळगाव कर्नाटकचे असून महाराष्ट्रासाठी एक इंचही जागा देऊ नये . सरकारने चांगले वकील नेमावेत आणि सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची याचिका फेटाळून लावण्याची दक्षता घ्यावी अशी सूचना सिध्दरामय्यांनी केली .

तसेच या भागात शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत मात्र सरकार शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत.याकडे सरकार काहीच लक्ष देत नाही.तीन तास वीज देत आहे.तसेच 2019 मध्ये पुरामुळे संपूर्ण घरे गेली असतानाही ज्या कुटुंबांवर अन्याय झाला आहे. त्यांना सी श्रेणीत टाकून त्यांच्यावर अधिक अन्याय केला आहे . उद्याच्या अधिवेशनात मी ह्यावर चर्चा करणार आहे .

सतीश जारकीहोळी म्हणाले की, अथणी तालुक्याचे संगोळी रायण्णा पुतळ्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण झाले असून आमचे नेते सिद्धरामय्या यांच्या हस्ते ह्या पुतळ्याचे याचा आम्हाला अधिक आनंद आहे.  यावेळी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम.बी. पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार राजू कागे, रावसाब बेवनूर, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर मोहिते, नेते सदाशिव बुटाली, बसवराज बुटाली, प्रभू चन्नबसव महास्वामी, अमरेश्वर महास्वामी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

Tags: