Athani

कुमठळ्ळी यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये बोम्मई, मान्यवर सहभागी

Share

अथणीचे भाजप आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ आज अथणी येथे थाटात पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी सहभागी झाले होते.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील विजापूर रोडवरील आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या फार्म हाऊसवर आज यांचा मुलगा रजत आणि वधू मृणालिनी यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ आज थाटात पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर सहभागी झाले होते. बोम्मई, येडियुरप्पा यांच्यासह महसूल मंत्री आर अशोक, जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ, बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, वचनानंद स्वामीजी मान्यवर यावेळी सहभागी झाले होते. आमदार महेश कुमठळ्ळी यांनी सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.

Tags: