चिक्कोडी तालुक्यातील ननदी गावात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिक्कोडी तालुक्यातील ननदी गावात , शुक्रवारी रात्री 10 वाजता निंबाळकर यांच्या शेतात दोन बिबट्या आढळून आल्याची माहिती शासनाला मिळाली. बिबट्या गावात आल्याची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.त्यामुळे ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कालपासून बिबट्याची शोधमोहीम सुरु केली आहे.

नुकतेच चिक्कोडी तालुक्यातील येडूर , चंदूर , इंगळी या नदीकाठच्या गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.


Recent Comments