पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या चिक्कोडी जिल्हा भाजप युनिटने निषेध केला.

बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला. चिक्कोडी शहरातील भाजप जिल्हा मुख्यालयापासून निघालेला निषेध मोर्चा बसव सर्कलपर्यंत नेण्यात आला आणि तेथे भाजप कार्यकर्त्यांनी भुट्टोविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाला चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली यांनी संबोधित केले .
चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, भाजप नेते सतीश आप्पाजीगोळ, नागप्पा खोकरे, बसवराज डोणवडे, रवी सांखे , शांभवी अश्वत्थपुर, सुवर्णा हंपण्णावर, गीता पाटील, संतोष मिरजे, सुनीता अप्पाजीगोळ, प्रसाद पचंडी आदी उपस्थित होते.


Recent Comments