भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरते मर्यादित राहू नये, असे मत माजी खासदार रमेश कत्ती यांनी व्यक्त केले.

आज त्यांनी हुक्केरी शहरातील जुने तहसीलदार कार्यालय परिसरात आंबेडकर पुतळ्याच्या भूमिपूजनाप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हुक्केरी शहरात राजेश्वरी आणि विश्वनाथ कत्ती ट्रस्टकडून महान पुरुषांचे पुतळे उभारण्यात येत आहेत . आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून ते भारताचे भूषण बनले आहेत, त्यांना समाजापुरते मर्यादित ठेवू नये आणि देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्याकडे स्वाभिमानाने पाहावे .

बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी , आज दिवंगत उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती यांनी भूमिपूजन करून , जिल्हा अनुसूचित जाती,जमाती अत्याचार नियंत्रण समितीचे सदस्य सुरेश तळवार यांनी सांगितले कि, बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी हुक्केरी तालुक्यात विविध दलित संघटनांचे नेते तनमनधन अर्पून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर तालुक्यातील दलित नेत्यांनी माजी आ . अशोक पट्टणशेट्टी, जयगौडा पाटील, दलित नेते रमेश हुंजी, मल्लिकार्जुन राशींगे, दिलीप होसमनी, बी.के.सदा, उदय हुक्केरी, भाऊ साहेब पंद्रे, शंकर थिप्पनायक, शिवानंद , सदा कांबळे, रमेश गुरवर, राजेंद्र गुरवर, टी. बसवराज खडकभावी, मुथ्थू कांबळे, आदी उपस्थित होते.


Recent Comments