नागेरहाळ गावातील रस्त्यांच्या विकासासाठी ४१ लाख रुपये मंजूर करुन, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार) ग्रामस्थांच्या उपस्थितीत काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्याचवेळी नागेरहाळ गावात आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची माहिती घेतली.
मतदारसंघातील प्रत्येक गावात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून मतदार संघात गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला दिली जात आहे. मतदारसंघातील एकाही गावाकडे दुर्लक्ष न करता सर्वच गावात विकासकामे सुरू असून, गावांच्या व जनतेच्या समृद्धीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील तुमच्या कुटुंबातील कन्या या नात्याने कोरोनाच्या काळात सर्वांच्या कष्टाला आपण प्रतिसाद दिल्याचे सांगून, ‘जनतेची सेवा हीच जनार्दनाची सेवा’ म्हणून अडचणीत आलेल्या सर्वांची सेवा करण्यास मी तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी गावातील जेष्ठ मंडळी बसवनेप्पा पगडा, आडवैय्या कुलकर्णी, सिद्धप्पा गुंडुगोळ, नागय्या हवालदार, नागाप्पा यल्लूर, यल्लाप्पा दोडवडी, रवी बंधी, गंगाधर यल्लूर, चंद्रप्पा अक्कन्नवर, नागप्पा दोडवडी, कुमार दोडवडी, , कुमार हवलदार. , बसवराज, सोमू नंदी, रुद्रप्पा चिन्नावर, गावातील युवक, निकटवर्तीय व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments