Kagawad

ऐनापुर जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्व भागातील कालव्याची होणार दुरुस्ती :8 कोटी रुपयांच्या अनुदानातून कामकाज

Share

ऐनापुर जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्व भागातील कालव्याच्या दुरुस्तीच्या , 8 कोटी रुपये खर्चाच्या कामकाजाचा शुभारंभ आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कागवाड मतदारसंघात लाखो शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या ऐनापूर उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कालव्याचे पाणी आटले आहे.
शुक्रवारी आमदार श्रीमंत पाटील यांनी ऐनापूर येथील कालव्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्य अभियंता के. रवी यांनी , आमदारांना माहिती देत असताना सांगितले कि ऐनापुर उपसा जालासींचं प्रकल्प पूर्ण होऊन १२ वर्षे उलटली असून कालव्यातील पाण्याची गळती वाढली आहे.

हजारो शेतकऱ्यांच्या मालकीच्या सुमारे दोन लाख एकर जमिनीवर सतत पाणी साचल्याने तेथील जमिनींची धूप झाली आहे. येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार श्रीमंत पाटील यांच्यासमोर ठेवला असता कालव्याची गळती थांबवण्यासाठी तीन कोटी, नंतर पाच कोटी आणि नंतर आठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लाखो एकर जमिनीवर पुन्हा सातत्याने पीक घेता येईल, असे ते म्हणाले.

आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, ऐनापूर उपसा जलसिंचन प्रकल्प 2011 मध्ये पूर्ण झाला, मात्र निकृष्ट कामगिरीमुळे कालवे फुटून त्यातून पाणी बाहेर पडून कालव्यांलगतच्या जमिनी पाण्याखाली गेल्याने हजारो शेतकर्यांना जमिनीची धूप होत आहे. माझ्या निदर्शनास येताच मी आठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली, त्यांनी अधिकाऱ्यांना अनुदान मंजूर करून कालव्याचे काम नीटनेटके करण्याच्या सूचना दिल्या, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या असल्याचे आमदार म्हणाले.

या कार्यक्रमात पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता के. रवी, बसवराज गलगली, प्रशांत पोतदार , डी.के. राठोड, बसवराज मुचंडी, शेतकरी नेते दादा पाटील, सुभाष पाटील, रतन पाटील, नानासाहेब अवताडे , नवलू हालरोट्टी, विनोद चांडकी, तमन्ना परशेट्टी, आण्णासाहेब दुगुणांवर , निंगाप्पा चौघुले यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

Tags:

mla-shrimant-patil-drive-for-the-irrigation/