Athani

अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल : विद्यार्थ्यांसहित ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन

Share

अथणी तालुक्यातील कोटलगी गावात बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले . व्हॉइस ओव्हर : अथणी तालुक्यातील कोटलगी गावात अनियमित बस सेवा आहे . विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे.कोटलगी हे गाव अथणी तालुक्यातील शेवटचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात बसेसची गरज आहे.मात्र एकाच वेळी दोन-तीन बसेस आल्यास प्रवाशांची सोय होते.बस प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतात.फूट बोर्डवर उभे राहून प्रवास करावा लागतो . जर काही अपघात घडल्यास याला अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला .

सुरक्षित प्रवासासाठी जादा बसेस सोडाव्यात , अशी मागणी आंदोलकांनी केली.

बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो . परीक्षा काळात देखील गैरसोय होते . यासंदर्भात एका विद्यार्थिनीने तीव्र नाराजी व्यक्त केली . बस सुविधा व्यवस्थित देण्याचे आश्वासन मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहील असे सांगितले .

अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनात विद्यार्थी व पालकांनी ,अथणी आगाराच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचे दिसून आले.

Tags:

athani-students-protest-for-bus-facility/