चाइल्ड पॉर्न व्हिडिओ डाउनलोड करून शेअर करणाऱ्यांवर नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने करडी नजर ठेवली आहे. चाइल्ड पॉर्न व्हिडिओ डाउनलोड करून शेअर केल्याप्रकरणी एनसीआरबीने विजापुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जगभरात चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनद्वारे चाइल्ड पॉर्न व्हिडिओ डाउनलोड करून शेअर करणाऱ्या विजापूरमधील 7 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे सर्व सात जण विजापूर येथील एका उच्चभ्रू व्यक्तीची मुले असल्याची माहिती समोर आली आहे.
एनसीआरबी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण बेंगळुरच्या सीओडी अधिकार्यांकडे सोपवले. सीओडी अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती सीइएन पोलिसांना पाठवण्यात आली. त्यानुसार सीइएन पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात चाइल्ड पॉर्न व्हिडिओ डाउनलोड आणि शेअर केल्याप्रकरणी एकूण 552 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Recent Comments