Politics

विजयेंद्रच्या लढतीबाबत पक्ष निर्णय घेईल : बैरती बसवराज

Share

बी. वाय. विजयेंद्र असोत किंवा अन्य कोणी, कोण कुठून लढायचे याचा निर्णय पक्ष घेईल असे नगरविकास मंत्री बैरती बसवराज यांनी आज विजापुरात सांगितले.

भाजपच्या विजापूर जिल्हा कार्यालय उदघाटनासाठी आले असता, बैरती बसवराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध बी. वाय. विजयेंद्र यांच्यात लढतीबाबत बोलताना बैरती बसवराज यांनी, कोणाला कुठे उभे करायचे हे पक्षाने ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली. हायकमांड आणि पक्ष ते ठरवेल. विजयेंद्र यांनीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

येडियुरप्पा अँसिजे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना संसदीय मंडळावर घेऊन मानाचे स्थान दिले आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करू. यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. विरोधकांना पराभवाची भीती वाटतेय म्हणून ते नाही नाही त्या कंड्या पिकवत आहेत असा टोला त्यांनी हाणला. जनार्दन रेड्डी यांनी नवीन पक्ष स्थापन करणार असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असे त्यांनी सांगितले.

विजापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे. आता महापौर-उपमहापौर आणि स्थायी समिती निवडणूक व्हायची आहे. ती लवकर घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांना तारीख निश्चित करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

Bairati Basavaraj